। अहमदनगर । दि.10 ऑक्टोबर 2022 । कोठला येथील राज चेंबर परिसरात उभ्या असलेल्या युवकाला काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी सादिक लिलायक शेख (रा.आलमगीर, भिंगार) हा काही खासगी कामानिमित्त राज चेंबर परिसरात गेला असताना तीन अनोखी व्यक्ती त्याच्याकडे आले.
अंगात घातलेल्या शर्ट कोणता आहे? हे ब्रॅण्डेड आहे का? असे म्हणून त्याच्यासोबत हुज्जत घालू लागले. त्याने प्रतिकार केला असता फायटरच्या साह्याने त्याच्या तोंडावर मारून त्याला जखमी करून खिशातील 28 हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी सादिक शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------
👉 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे अंत्यदर्शन
👉 लम्पी बाधित जनावराचा मृत्यू झाल्यास सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई : पशुसंवर्धन आयुक्त
👉 संजय गांधी निराधार योजनेसाठी ६२५ कोटी, श्रावणबाळसेवा राज्य निवृत्तीवेतनसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचा निधी
Tags:
Ahmednagar
