रोजगार मेळाव्यातून १२३ उमेदवारांना नोकऱ्या

। अहमदनगर । दि.22 ऑक्टोबर । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मूलभूत प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी १९ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात १२३ सुशिक्षित बेरोजगारांची जिल्ह्यातील उद्योग व आस्थापनावर अंतिम निवड करण्यात आली.  अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्ह्यातील दहावी/बारावी उत्तीर्ण, आयटीआय सर्व ट्रेड, पदविका व पदवीधारक (बी.ए, बी. कॉम, बीएस्सी इ.) ही शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी मेळाव्यात भाग घेतला.  जिल्ह्यातील १६ आस्थापनांनी ७६१  रिक्तपदे अधिसूचित केली होती. 

यामध्ये श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह, कांकरिया ऑटोमोबाईल, शहा ब्रदर्स, महात्मा फुले कृषी विद्यापीठ-राहुरी, इटॉन इंडस्ट्रियल सिस्टम, स्नेहालय, अहमदनगर, रिलायन्स निप्पॉन लाईफ, आदित्य बिर्ला हेल्थकेअर, साईक कंट्रोल गेझेस, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग इ. नामांकित उद्योजक आस्थापनांच्या मुनुष्यबळ विभागाचे अधिकारी/ प्रतिनिधींनी उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे २८० उमेदवारांपैकी १२३ बेरोजगार तरुणांची अंतिम  निवड करण्यात आली आहे.

या मेळाव्यास शासकीय तांत्रिक विद्यालयाचे प्राचार्य यु. के. सुर्यवंशी,   जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक अतुलजी दबंगे,कौशल्य विकास अधिकारी रविकुमार पंतम,  श्री दिग्वीजय जामदार, श्री श्रीकांत कोकाटे व  स्वप्निल ठाणगे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post