बक्षी यांची लंगर सेवेला नेहमीच साथ लाभली : जनक आहुजा

घर घर लंगर सेवेला रवी बक्षी यांची मदत
 
तारकपूरला गरजूंना फुड पॅकेटसह फळांचे वाटप

बक्षी यांची लंगर सेवेला नेहमीच साथ लाभली : जनक आहुजा
 
 
। अहमदनगर । दि.11 ऑक्टोबर 2022 ।  कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजू घटकांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास उद्योजक रवी बक्षी यांनी अन्न-धान्य व फळांची मदत दिली. यावेळी जनक आहुजा, दलजितसिंह वधवा, सतीश गंभीर, प्रितपालसिंह धुप्पड, प्रशांत मुनोत, हरजितसिंह वधवा, जतीन आहुजा, राजू जग्गी आदींसह लंगर सेवेचे सेवादार उपस्थितह होते.

उद्योजक रवी बक्षी यांनी कोरोना काळात देखील लंगर सेवेला नेहमीच मदतीचा हात दिला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इतर खर्चांना फाटा देऊन लंगर सेवेच्या सेवा कार्यात मदत दिली. यावेळी लंगर सेवेच्या वतीने बक्षी यांचा सत्कार करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

जनक आहुजा म्हणाले की, बक्षी कुटुंबीय सामाजिक योगदानाने कार्य करत आहे. लंगर सेवेला त्यांची नेहमीच साथ लाभली. कोरोना काळातही त्यांच्या माध्यमातून मोठी मदत उपलब्ध झाल्याने अनेक गरजूंना जेवण पुरवता आले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
------------ 
 
 
 
 
 

Post a Comment

Previous Post Next Post