। नवी दिल्ली । दि.05 ऑगस्ट 2022 । महागाईसह देशातील महत्त्वाच्या मुद्यांवर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसने आज महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवनासमोर आंदोलन केले. त्यानंतर राष्ट्रपती भवनापर्यंत काँग्रेसच्या खासदारांनी रॅली काढली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.
👉खाद्यतेलाच्या नमुन्यांचे होणार सर्वेक्षण
संसद भवनासमोर निदर्शने - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसद भवनासमोर काँग्रेसच्या खासदारांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. काळा पेहराव करीत काँग्रेसने सरकारचा निषेध केला. माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसने नेते पी. चिदंबरम यांनी हे आंदोलन महागाई आणि अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ सुरू असल्याचे सांगितले.
👉 राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात
राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा - संसद भवनासमोर आंदोलन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी आपला मोर्चा राष्ट्रपती भवनाकडे वळविला. संसद भवन ते राष्ट्रपती भवन अशा खासदारांच्या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी हे करीत आहेत. तत्पूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सरकारवर घणाघाती हल्ला केला.
