। अहमदनगर । दि.21 ऑगस्ट । कोव्हिड-2019 महामारीचा प्रादूर्भाव रोखण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत आयोजित केल्या जाणार्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन मागील तीन वर्षापासून करण्यात आले नव्हते. मात्र, सन 2022-23 शैक्षणिक वर्षात या स्पर्धांचे आयोजन सुरु करण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर, जिल्हयातील सर्व मान्यताप्राप्त व धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत एकविध खेळाच्या संघटनांनी नमुद सर्व कागदपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेची घटना व नोंदणी प्रमाणपत्र, संघटनेचा कार्यालयाचा पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी, पदाधिकारी यांची यादी व पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी, महाराष्ट्र राज्य संघटनेचे मान्यता पत्र, जिल्हा-विभाग तसेच राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाकरीता पात्र पंचांची यादी, ई-मेल आयडी व संपर्क क्रमांक आदी कागदपत्रे सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar
