। अहमदनगर । दि.18 जानेवारी । पुणे येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशानुसार छावा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी सचिव पदी दत्ता वामन यांची निवड करून त्यांना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अशिष खंडेलवाल यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नूतन पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे सचिव दत्ता वामन म्हणाले की, अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याला तडा न जाऊ देता मी संघटनेच्या मार्फत विविध क्षेत्रात तळागाळापर्यंत जाऊन संघटना मजबुतीकरण व संघटनेचे धैर्य धोरण जनतेपर्यंत पोहोचविनार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पुढील वाटचाल जोमाने करणार व युवकांच्या माध्यमातून संघटना मजबूत करणार असल्याची भावना व्यक्त केली.
या निवडीबद्दल विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, सह.केंद्रीय अध्यक्ष भीमभाऊ मराठे, प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे, अप्पासाहेब कुडेकर, भगवान माखने, प्रतापसिंह कांचन अशोकराव चव्हाण मनोरे मच्छिंद्र चिंचोळे, राहुल धस, जिल्हा अध्यक्ष नितीन पठारे सुरेखाताई सांगळे आदींनी दत्ता वामन यांचे अभिनंदन केले.