अरुणकाका जगताप नगर शहराला लाभलेले सर्वसमावेशक लोकाभिमुख नेतृत्व: विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे

अरुणकाका जगताप नगर शहराला लाभलेले सर्वसमावेशक लोकाभिमुख नेतृत्व: विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचा गुणगौरव समारंभ उत्साहात; कै. अरुणकाका जगताप यांचा मरणोपरांत सन्मान
 

। अहिल्यानगर । दि.27 सप्टेंबर 2026 । " माजी नगराध्यक्ष माजी आमदार कै. अरुणकाका जगताप हे अहिल्यानगर शहराला लाभलेले एक अत्यंत सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्व होते," असे गौरव उद्गार महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी काढले. मराठा सेवा संघ प्रणित अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नगर कल्याण रोडवरील जाधव लॉन्स येथे 'गुणगौरव समारंभ २०२६' चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राम शिंदे बोलत होते.

या सोहळ्यात पतसंस्थेच्या वतीने स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या सामाजिक राजकीय योगदानाबद्दल त्यांना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र सचिन जगताप, कुटुंबीय व अरुणकाका यांच्यावर प्रेम करणार्‍यां सहकाऱ्यांनी स्वीकारला.

 आपल्या भाषणात बोलताना सभापती प्रा. राम शिंदे यांनी मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्याची आणि संस्थेचे मार्गदर्शक तथा संस्थापक चेअरमन इंजि. डॉ. विजयकुमार ठुबे यांच्या कार्यकर्तुत्वाची विशेष स्तुती केली. "आपली प्रशासकीय सेवा संपल्यानंतर आणि निवृत्तीनंतरही स्वतःचे संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित करणे हे सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे," असे प्रा. शिंदे म्हणाले.

या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांत प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला:
जीवनगौरव पुरस्कार: प्राचार्य रघुनाथ आगळे (माजी प्राचार्य, ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा), इंजि. बबनराव खिलारी (निवृत्त उपअभियंता व माजी चेअरमन), शिवश्री सुरेश चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते), आणि इंजि. शिवमती सुजाताताई ठुबे (कार्याध्यक्षा, आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड) यांना प्रदान करण्यात आला.

कर्मतपस्वी पुरस्कार: सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पारनेरचे डॉ. रफिक सय्यद यांना देण्यात आला.
मराठा युवा उद्योजक पुरस्कार: शिवश्री राजेंद्र ससे (अहिल्यानगर), शिवश्री सुधीर व शिवमती माधुरी नवले (श्रीरामपूर) आणि शिवश्री किरण बेरड (सोनेवाडी) यांना प्रदान करण्यात आला.
विशेष सत्कार: सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीगोंद्याचे सहाय्यक निबंधक किरण काशीनाथ आव्हाड व पतसंस्थेच्या आदर्श कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाईल बँकिंग ॲपचा शुभारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव या सोहळ्यात तंत्रज्ञानाचा स्वीकार करत संस्थेच्या संगणक प्रणालीद्वारे विकसित करण्यात आलेल्या 'मोबाईल बँकिंग ॲप'चा शुभारंभ माजी शासन सचिव शिवश्री सुनील चव्हाण (IAS) यांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय, सन २०२५-२६ मधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
 
या सोहळ्यास  इतिहास संशोधक व शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, अहिल्यानगरच्या महापौर ज्योतीताई गाडे दक्षिण जिल्हाध्यक्ष इंजि. प्रवीण दहातोंडे, माजी व्हा. चेअरमन बाळकृष्ण काळे, व्हा. चेअरमन उदय अनभुले, संचालक किशोर मरकड, संभाजीराव मते, काशीनाथ डोंगरे, द्वारकाधीस राजेभोसले, प्रा. डॉ. कल्पना ठुबे, राजश्री शितोळे, उत्तर जिल्हाध्यक्ष इंजिनिअर विवेक लव्हाट, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष नंदिनी सोनाळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, लक्ष्मण सोनाळे, ज्ञानदेव पांडुळे, सतीश इंगळे, बाळकृष्ण कराळे, प्राध्यापक किसन पायमोडे, यशवंत शिंदे, एडवट काशिनाथ डोंगरे, इंजि.  संभाजी मते,  द्वारकाधीश राजेभोसले, इंजिनिअर बाळासाहेब सोनाळे, अ‍ॅड.राजेश कावरे, अच्युत गाडे, रामदास काळदाते, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड यांच्यासह पतसंस्थेचे सभासद, पालक, गुणवंत विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. प्रवीण दहातोंडे यांनी केले तर संस्थेच्या वाटचालीचा आढावा बाळकृष्ण काळे यांनी मांडला.  पुरस्कारार्थींचा परिचय आणि भूमिका किशोर मरकड यांनी मांडली. शेवटी व्हा. चेअरमन उदय अनभुले यांनी आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन अविनाश कराळे यांनी केले.
 
कार्यक्रम यशस्वतीसाठी सह व्यवस्थापक बबनराव सुपेकर, गोरख काटे, अशोक आरगडे, अनुपमा भापकर, प्रितेश बोरुडे, महेश नलवडे, पुष्पा इंगळे, गणेश खोर्दे, संतोष पारखे, कांता जाधव, लेखाधिकारी रणजित रक्ताटे, कनिष्ठ लिपीक कविता ढोणे, सूर्यकांत कडू, दीपमाला पवार, दिलीप बर्डे, मंजुषा गुंजाळ, प्रशांत बोरुडे, रोहिणी मुळे, शुभम केसभट, माधुरी शेळके,रोहन तनपुरे, निलेश जाधव, सहायक मनेश रोहकले, अक्षय डोंगरे, सुप्रिया मोरे, विनोद मेहेत्रे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post