राज ठाकरे यांच्या विषयी काय म्हणाले अशोक चव्हाण...

। अहमदनगर-शिर्डी । दि.29 एप्रिल । हनुमान चालीसा हा काय दुसऱ्याच्या घरासमोर म्हणायचा विषय आहे का? तो श्रद्धेचा विषय असून प्रत्येकाने तो आपापल्या घरात पठण केला तर चांगलेच आहे. 

मात्र, राज ठाकरे  विकास कामाबद्दल न बोलता केवळ भोंगे आणि हनुमान चालीसा अशा मुद्यांच्या आधारावर जातीय तेढ निर्माण करत आहेत. 

त्यामुळे संपूर्ण देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण होत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा बांधकाममंत्री अशोक चव्हाण  शुक्रवारी दिली. ते साईंचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ भाजपा व्यतिरिक्त असणाऱ्या राज्यांना पेट्रोल, डिझेल यावरील कर कमी करण्याचा मुद्दा चुकीचा असून केंद्र सरकारने जीएसटीची हजारो कोटी रुपयांची रक्कम अजूनही महाराष्ट्राला दिली नाही. 

मुळातच पेट्रोल, गॅस आणि ऑइल हे खाते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र यासाठी केवळ राज्याला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कायदा सर्वांना सारखाच आहे. मात्र, देशद्रोहाचा कायदा हा जाचक असून त्यात बदल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

---------------

खालील बातम्या देखील वाचा...

जवळा हत्याकांडातील आरोपींचा जामीन न्यायालयाने नाकारला

मुलाच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या दोघांना अटक 

राष्ट्रवादी काँग्रेसची महावितरण कार्यालय कडे मागणी

Post a Comment

Previous Post Next Post