रेसिडेन्शिअल हायस्कूलचा 95.99 टक्के निकाल : 90 ते 95 टक्के गुण मिळवणारे 77 विद्याार्थी

। अहमदनगर । दि.18 जुन ।  शालेय जिवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता 10 वीचा रेसिडेंन्शिअल विद्यालयाचा निकाल 95.99 टक्के लागला आहे. विद्यालयातून एकुण 424 विद्यार्थांनी इयत्ता 10 ची परिक्षा दिली होती ; यापैकी 407 विद्यार्थी पास झाले आहेत. यात प्रेम बांगर या विद्यार्थ्यांने 99.20 टक्के गुण मिळवुन विद्यालयात प्रथम आला. 

सह्याद्री गायकवाड हीने 97.60 टक्के गुण मिळवुन द्वितीय, ओमकार सोनवणे 97.40 टक्के गुण मिळवुन तृतीय, आदित्य पाचपुते 97 टक्के गुण मिळवुन चतुर्थ तर अकाश बोरूडेने 96. 60 टक्के गुण मिळवुन विद्यालयात पाचवा क्रमांक मिळवला असल्यची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विजय  पोकळे यांनी दिली.

विद्यालयाती 14 विद्यार्थी 95 टक्यांपेक्षा जास्त 63 विद्यार्थी 90 टक्यांपेक्षा जास्त तर राज्य संस्कृत विषयात 15 विद्यार्थांनी 100 पैकी 100 गुण मिळवले. इंग्रजी विषयात 45 विद्यार्थांनी 90 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असल्याचे उपप्राचार्या संगिता ठुबे यांनी सांगितले.

यासर्व गुणवंत विद्यार्थांचा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष जी. डी. खानदेशे, प्राचार्य विजयकुमार पोकळे, उपप्राचार्य संगिता ठुबे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व पेठे भरवून सन्मान करण्यात आला.

वेळी बोलताना झावरे म्हणाले, संस्थेचा निकालाची परंपरा प्राचार्य पोकळे व शिक्षकांच्या सहकार्‍यांनी कायम ठेवली आहे. जी. डी. खानदेशे म्हणाले, कोविड काल असताना शिक्षकांनी विशेषता ऑनलाईन अभ्यासक्रमावर दिला भर हे आजच्या निकालातून दिसून आले.

शिक्षकंचे ऑनलाईन शिक्षण कौतूकास्पद : कोविड काळात शिक्षकांनी इंग्रजी, गणित, सायन्स या विषयावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे घरातून जाणवयाचे. कोविड काळात विद्यार्थां शेजारी बसून ऑनलाईन शिकवण्याची पध्दत भावली त्याचे फळ आजच्या निकालावरून दिसून आले... पालक कविता बोरूडे.

----------------

👉 यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन; आवड आणि कल यानुसार पुढील मार्ग निश्चित करा : शालेय शिक्षण मंत्री 

👉 दहाविच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी

👉  कुटुंबीयांना मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

 

Post a Comment

Previous Post Next Post