। सोलापूर । दि.23 मे 2022 । येथे दोन कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर तीन जण जखमी झाले आहेत. मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर येथील माळी पाटीजवळ हा भीषण अपघात झाला.
मृतांमध्ये मोहोळ येथील रहिवासी असलेल्या खान कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच
मोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमी व्यक्तींना सोलापूरच्या रुग्णायलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर येथील माळी पाटीजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. ही दुर्देवी घटना मोहोळ-पंढरपूर महामार्गावर घडली.
या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.