। अहमदनगर । दि.20 मे । राज्यातील काही ठिाकणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वार्यासह चांगलाच पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. अहमदनगर शहरातही जोरदार पावसाने हजेरी लावली.
पाऊस सुरु होताच विद्युत पुरवठा खंडित झाला. विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुले उकड्यापासून नगरकरांची सुटका झाली आहे, मात्र शेतकर्यांची चिंता वाढली आहे. कारण, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कांदा काढणी सुरू असल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.
कडाक्याचा उन्हानंतर अवकाळी पावसाने गुरुवारी रात्री 9.30 दरम्यान नगर शहर, उपनगरात आणि एमआयडीसी परिसरात जोरदार हजेरी लावली. साधारण 20 ते 25 मिनीटे पावसाच्या जोरदार सरी कोसळ्या. शहरात अनेक ठिकाणी वीज गायब झाली. नगर तालुक्यात अनेक गावांत जोरदार वार्यासह पाऊस झाला. या पावसामुळे आंब्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. गुरुवारी सकाळपासूनच आकाशामध्ये ढगांनी गर्दी केली होती. दुपारच्या वेळेस उकाडाही वाढला होता. सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता. नऊ वाजण्याच्या सुमारास जोराच्या वार्यासह विजांच्या कडकडाटात सुरुवात झाली. नगर शहरात पावसाने हजेरी लावताच वीज गुल झाली.त्यामुळे नगरकरांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला.
-------------------
सहकारी संस्थांचे निवडणूक कामकाज पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड