घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले

। नवी दिल्ली । दि.19 मे 2022 ।  देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. आज, गुरुवारी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. आता देशभरात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 1 हजार रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. 

आज घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 3.50 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, व्यावसायिक गॅस सिलिंडर 8 रुपयांनी महागला आहे.

आजपासून दिल्ली आणि मुंबईमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 1 हजार 3 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एका वर्षांत दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1 हजार 3 रुपयांवर गेला आहे. 

आज एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1 हजार 29 रुपये आणि चेन्नईमध्ये 1 हजार 18.5 रुपये झाली आहे. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post