। अहमदनगर । दि.19 मे 2022 । पेट्रोल पंपावर पैशाचा भरणा करण्यासाठी जात असलेल्या पेट्रोलपंप कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवून डोळ्यात मिरची टाकून त्याच्याकडील 11 लाख 99 हजार आठशे रुपये मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेले.
ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी परिसरातील जवळगाव ते देवदैठण कडे जाणाऱ्या रोडवर हॉटेल जवळ घडली. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी अमोल अशोक ढोले ( वय 22 राहणार पिंपरी कोलंदर तालुका श्रीगोंदा )
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी मोटारसायकलस्वारा विरूद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 394, 34 जबरी चोरीच्या गुन्हयाची नोंद केली अधिक तपास पोलिस निरीक्षक दुधाळ करीत आहे.
Tags:
Ahmednagar