नगरकरांचे प्रेम व आशीर्वादामुळे मी सुखरूप : आ.संग्राम जगताप


। मुंबई । दि.17 मे । मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातामधून ते आणि त्यांचा चालक अनुप काळे व सहकारी हे सुखरूप बचावले आहे.

मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसाठी रात्रीच मुंबईला त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स 5 या गाडीतून रवान झाले होते. ते आणि चालक आणि त्यांचे मित्र अनुप काळे व 2 स्वीय सहाय्यक असे पाच जण होते. रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते. 

एका ठिकाणी तिसर्‍या लेनमधून जाणारी एसटी बस लेन बदलून अचानक जगताप यांच्या वाहनासमोर आली. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही.

त्यामुळे ती बसवर मागील बाजूने धडकली.या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही.


आमदार संग्राम जगताप आज पहाटे मंत्रालयातील कामा निमित्त मुंबईला निघाले होते. यावेळी अपघात झाला यानंतर त्यांनी म्हंटले आहे की, नगरकरांचे प्रेम व आशीर्वादामुळे मी सुखरूप आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार संग्राम जगताप हे सुखरूप असून त्यांनी मुंबई येथे रवाना होऊन पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post