। अहमदनगर । संगमनेर । दि.17 मे । संगमनेरच्या गुंजाळवाडी रोडवरील दि सीक्रेट पॅराडाईज कॅफेवर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हुक्का पितांना दहा जण आढळले. त्यांच्या जवळून ३८ हजार ८५० रुपये किमतीचे हुक्का पिण्याचे साहित्य व फ्लेवर्ससह ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. रविवारी १० वाजता हि कारवाई करण्यात आली.
कॅफे मालक पंकज सुभाष शिंदे याच्या कॅफेवर बेकायदा सार्वजनिक ठिकाणी मानवी जीवितास धोका व शासनाने बंदी घातलेले हुक्का पिण्याचे साहित्यासह प्रतीक महेश मुळे (वय २१, चंद्रशेखर चौक), ऋत्विक बाळासाहेब काळे (वय २२), मयूर बाळासाहेब काळे (वय २४, नेहरू चौक), श्रेयस दत्तात्रय काळे (वय २२, पार्श्वनाथ गल्ली),
श्रवण श्रीराम नावंदर (वय २८, संगमनेर), रोशन रावसाहेब वाबळे (वय २२, विठ्ठल मंदिरासमोर), आदेश नितीन गुंजाळ (वय २२, बाजारपेठ), शुभम राजेंद्र लगे (वय २६, घुलेवाडी), आकाश रवींद्र तवरेज (वय २७, नवघर गल्ली), शुभम दत्तात्रय काळे (वय २८, पार्श्वनाथ गल्ली), हे हुक्का पिंताना मिळून आले.
कॉन्स्टेबल कानिफनाथ दत्तात्रय जाधव यांच्या फिर्यादीवरून कॅफे मालकासह शहर पोलिसांनी सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कलमान्वये गुन्हा दाखल केला. सहायक फौजदार एस. एस. फटांगरे करीत आहे.
