केतकी चितळेच्या अडणीत वाढ

‘अ‍ॅट्रोसिटी’प्रकरणी केतकी चितळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी



। ठाणे । दि.20 मे । अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी भर पडली असून ’अ‍ॅट्रोसिटी’ प्रकरणी अटकेत असलेल्या केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून तिला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

अशात 2020 मध्ये दाखल झालेल्या ‘अ‍ॅट्रोसिटी’च्या गुन्ह्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. आज ठाणे न्यायालयात हजर केले असताना तिची पाच दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली.

तिने 2020 मध्ये सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टप्रकरणी अ‍ॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. एकंदरीतच केतकी चितळेच्या अडचणी कमी होण्यास तयार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post