माऊली पतसंस्थेच्यावतीने रंगनाथ फुलसौंदर, प्रा.सुजित बेडेकर अतुल डागा यांचा सन्मान
पदाधिकार्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे काम केले पाहिजे : अॅड.महेश तवले
। अहमदनगर । दि.20 मे 2022 । समाजातील विविध संस्थेच्या माध्यमातून नगरमध्ये एक चांगले काम उभे राहत आहे. यासाठी संस्थेचे पदाधिकारी आपल्या कार्यकर्तुत्वाने संस्थेच्या लौकिकात भर पाडत आहे. अशा पदाधिकार्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे काम आपण केले पाहिजे. त्यातून संस्थाचे कार्य व्यापक होऊन समाजोन्नत्तीचे काम होईल. आजचे सत्कार मुर्ती हे समाजातील प्रतिष्ठीत व सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग देणारे आहेत. आता मिळालेल्या पदाच्या माध्यमातून ते संस्थेचे कार्य अधिक व्यापक करतील, असा विश्वास माऊली पतसंस्थेचे चेअरमन अॅड.महेश तवले यांनी केले.
माऊली पतसंस्थेच्यावतीने विशाल गणपती देवस्थानच्या विश्वस्तपदी रंगनाथ फुलसौंदर, हिंद सेवा मंडळाच्या संचालकपदी प्रा.सुजित बेडेकर व महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अतुल डागा यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन अॅड.महेश तवले, व्हा.चेअरमन प्रशांत फुलसौंदर, छत्रपती ट्रस्टचे कार्याध्यक्ष नितीन वाघ, विश्वस्त बाळासाहेब साखरे, सुरेश लोळगे, गणेश नरसाल, मिलिंद धोंगडे, ज्ञानेश देशपांडे, अरुण तवले, अदित्य लोळगे, संतोष गाडे, संदिप शिर्के, संजय वाल्हेकर, उमेश क्षीरसागर, महेंद्र मैड, शिवाजी शिंदे, संतोष मखरे आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना प्रा.सुजित बेडेकर म्हणाले, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून काम केले पाहिजे. संस्थेच्या माध्यमातून चांगले विचारांचे लोक एकत्र येऊन सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने चांगले काम उभे राहत असते. पतसंस्थेच्यावतीने आमचा सन्मान करुन आमच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पतसंस्थेने केला असल्याचे सांगितले.
प्रशांत फुलसौंदर यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन सत्कारमूर्तीच्या कार्याचा गौरव केला. सुत्रसंचालन बाळासाहेब साखरे यांनी केले. शेवटी नितीन वाघ यांनी आभार मानले.
Tags:
Sahkar