। औरंगाबाद । दि.01 मे । महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा विषय अनेकांनी मांडला आहे, मी फक्त पर्याय दिला आहे. मशीदीवर लाऊडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा पठण करु, मोठ्याने लावू, असं आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
रविवारी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात दंगली घडवायची इच्छा नाही. मुस्लीम समाजानेही ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
Tags:
Breaking