। मुंबई । दि.31 मे 2022 । राज्यातील दुकाने, आस्थापने, शासकीय-निमशासकीय कार्यालयांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत संपणार आहे.
मात्र मराठी पाट्या लावण्यात आले नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकार अशांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.
सर्वच मराठी पाट्या लावणे बंधनकारक केले. सध्या शाळांमध्ये मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. पूर्वी दहापेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या आस्थापनेच्या दुकानाला मराठी पाट्या लावण्याची कायद्यात अट नव्हती.
या पळवाटेचा वापर करून मराठी पाट्याचा वापर होत नव्हता. आता याला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने राजभाषा विधेयक मंजूर केले आहे. सर्वच कार्यालय, छोटी- मोठी दुकाने, आस्थापनांवर मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
-----------
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेतकऱ्यांना पीक कर्जावर व्याज परतावा देणे केंद्राने सुरू करावे : पत्राद्वारे मागणी
