। अहमदनगर । दि.29 एप्रिल । राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या शैक्षणिक चळवळीत अनेकांनी जे योदान दिले त्यात कै. ह कृ काळे यांचे कार्य महत्वाचे आहे . बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांच्या शिक्षणासाठी काळे यांनी आयुष्य वेचले असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष , माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी केले .
संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात कै. ह. कृ काळे प्रतिष्ठाण व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कै ह. कृ. काळे तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात ते आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
या स्पर्धेचे उदघाटन माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव काळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. मेधाताई काळे, पोपटराव काळे, प्रा. आढाव, महाविद्यालयाच्या कला शाखेचे उप प्राचार्य डॉ. बी बी सांगडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस बी कळमकर तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना झावरे यांनी कै काळे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब काळे हे उच्च शिक्षित असूनही त्यांनी नोकरी केली नाही. अहमदनगर सारख्या दुर्गम जिल्ह्यातील कष्टकरी शेतकरी आणि बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी अविरतपणे काम केले . त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अव्याहतपणे करीत आहे .
दिवसभर चालेल्या या वक्तृत्व स्पर्धेचा मानाचा करंडक न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने पटकावला . याच महाविद्यालयाच्या किशोर बोबडे या स्पर्धकाने २५०० रुपये रोख रकमेचे पहिले बक्षीस मिळवले. २००० रुपये रकमेचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस कृषी व जैव तंत्रद्न्यान महाविद्यालयाचा विद्यार्थी महेश उशीर याला तर १५०० रूपयांचे तिसरे बक्षीस बलभीम महाविद्यालय बीड च्या ओम हरी जाधव याने मिळवले. न्यू लॉ कॉलेजचा विद्यार्थी माधव दुसुंगे याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे सहसचिव ऍड विश्वासराव आठरे पाटील, न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एच झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना दरे यांनी कै . ह. कृ. काळे यांनी संस्थेसाठी केलेल्या अफाट कार्याची माहिती दिली , काळे यांची रहाणी साधी होती आणि विचारसरणी उच्च होती असे त्यांनी सांगितले. ऍड आठरे यांनी आपल्या भाषणात कै. काळे यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंबाडे यांनी केले. सूत्र संचालन प्रा. सुवर्णा कदम यांनी केले तर आभार प्रा. नलिनी विखे यांनी मानले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजेंद्र साबळे, प्रा. निखिल गोयल, प्रा. डॉ. मीना साळे, प्रा. निलेश लंगोटे, प्रा. मयूर रोहोकले, प्रा. नितीन काळे आदींनी परिश्रम घेतले.
----------------
‘महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, फक्त सत्तेचे भोगी’ ; राज ठाकरे
