कान्स महोत्सवाच्या ज्युरी मेंबरमध्ये दीपिकाची वर्णी

। मुंबई । दि.28 एप्रिल । ७५ व्या डी कान्स महोत्सवाने आपल्या निर्णायक सदस्यांची घोषणा केली आहे. फ्रान्सचे दिग्गज अभिनेते विंसेंट लिंडन ज्युरीचे अध्यक्ष आहेत. तर बॉलीवूडची सुपरस्टार दीपिका पदुकोनला महोत्सवाच्या ज्युरी मेंबरमध्ये घेण्यात आले आहे. हा महोत्स्व डी कान्स १७ मेपासन २८ मेपर्यंत चालणार आहे. 

या महोत्स्वात सहभागी होण्याची माहिती स्वत: दीपिकाने सोशल मीडियावर दिली. त्यात तिने कान्स सिने महोत्स्वात तिच्यासोबत सहभागी होणाऱ्या इतर सदस्यांचे फोटोही टाकले आहेत. तर कान्स महोत्स्वाचे एक अधिकृत वक्तव्यदेखील आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 स्विडिश अभिनेत्री नुमी रॅपेस आणि इटलीची अभिनेत्री-दिग्दर्शक जॅस्मीन ट्रिंकादेखील ९ सदस्याच्या पॅनलमध्ये सहभागी आहे. दीपिकाच्या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर ती ‘पठान’मध्ये दिसणार आहे. शाहरुखसोबत ती चौथ्यांदा काम करणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post