। मुंबई । दि.28 एप्रिल । विक्रांत बचाव मोहिमप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया आणि त्यांचा मुलगा नील सोमैया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमैया पितापुत्रांना पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
सोमैयांना १४ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिलेला आहे.किरीट सोमैयांना आर्थिक गुन्हे विभागाकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार सोमैयांची १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशी करण्यात आली.
त्यानुसार आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणीपर्यंत सोमैया पितापुत्रांना अटक करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. तसेच सोमैया पितापुत्रांना १४ जूनपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा कायम आहे.
यावर, किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आम्ही चौकशीत सहकार्य करू’, असे सोमैया म्हणाले.
-----------------
कान्स महोत्सवाच्या ज्युरी मेंबरमध्ये दीपिकाची वर्णी
