पोस्टल डिव्हीजन सोसायटीची निवडणुक बिनविरोध

। अहमदनगर । दि.28 एप्रिल । शंभर वर्ष जुनी व राज्य कार्यक्षेत्र असलेल्या अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को-ऑप क्रेडीट सोसायटीची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत वरिष्ठांच्या समन्वयातून इतरांनी माघार घेतल्याने 11 अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणुक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी व्ही.के.मुटकुळे यांनी केली. या नंतर नूतन संचालक व सभासदांनी मोठा जल्लोष केला.

सर्व सभासदांच्या सहकार्याने नवीन पिढीकडे नेतृत्व सोपवत ही निवड बिनविरोध करण्यात आली. बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे - निसार शेख, प्रफुल्लकुमार काळे, प्रमोद कदम, महेश तामटे, रामेश्वर ढाकणे, किशोर नेमाणे, सलिम शेख, सुनिल कुलकर्णी, शिवाजी कांबळे अर्चना दहिंडे, स्वप्ना चिलवर आदिंची  बिनविरोध झाली.

बिनविरोध निवडीबद्दल संस्थेचे माजी चेअरमन अनिल गांधी, दत्तात्रय जासूद, अमित कोरडे, सुनिल भागवत, बळी जायभाय, दिलीप खरात, मिलिंद भोंगले, विजय कोल्हे, सुनिल चांडोले, प्रशांत पवार, भाऊसाहेब शिंदे, आनंद भोंडवे, दिपक जसवाणी, देवेंद्र शिंदे, बलराम दाते, श्रीमती उर्मिला आडोळे, सचिन अस्वर, सुनिल धस, गणेश केसकर, सचिन देवकाते, महेश दांगट, 

जगदीश पेन्लेवाड, रमजान पठाण, धनंजय दैठणकर, इरफान पठाण, प्रताप कारखिले, सुभाष चव्हाण, आनंद कात्रजकर, संतोष झावरे, गोरक्ष आचार्य, अंबादास सुद्रीक, बाबासाहेब बुट्टे, कैलास भुजबळ, विशाल म्हस्के, शिवाजी विखे, वेदशास्त्री वाकळे, जय मडावी, अर्जुन जटाले, जावेद शेख आदिंनी नूतन संचालकांचे अभिनंदन केले.

अहमदनगर पोस्टल सोसायटी ही पोस्ट कर्मचार्‍यांची कामधेनू म्हणून ओळखली जाते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्ष लांबणीवर पडली होती. मोठ्या कालखंडानंतर निवडणुक बिनविरोध केल्याबद्दल सभासदांकडून कौतुक केले जात आहे.

---------------

खालील बातम्या देखील वाचा..

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये गोंदिया तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल

तब्बल १५ राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाचा तडाखा मात्र महाराष्ट्रात सात दिवसांपासून कुठेही भारनियमन नाही 

मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत कृतज्ञता सन्मान सोहळा 

Post a Comment

Previous Post Next Post