ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन


। मुंबई । दि.08 ऑक्टोबर 2026 । चित्रपट सृष्टीमधील दमदार आवाज, मनाचा ठाव घेणारा अभिनय आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. गोव्यामध्ये ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत केली. त्याशिवाय याच संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी ते बॉलिवूड अशी मुशाफिरी करणारा दमदार अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त व्यक्त केली जात आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाने रंगभूमी, सिनेसृष्टीवरच नव्हे तर समाजमनावरही शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांना 2013 मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीलकांती पाटेकर आणि मुलगा मल्हार असा परिवार आहे.

नाना पाटेकर यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. समाजातील सामान्य माणसाशी त्यांची नाळ कायम जोडलेली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल त्यांना असलेली तळमळ आणि मदतीसाठी त्यांनी केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post