राज ठाकरे यांची उत्तर सभेतील अनेक मुद्दे

तारे तोडणार्‍यांसाठी ही उत्तर सभा : राज ठाकरे

। मुंबई । दि.12 एप्रिल । अनेक पक्षाच्या नेत्यांचे जे अकलेचे तारे तोडले, त्याचं उत्तर मला द्यायचं असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आणि आज पत्रकार परिषद घेण्यापेक्षा ही सभा घेण्याचे ठरवले.

पत्रकार परिषद घेऊन देखील उत्तर देता आले असते मात्र तसे करायचे नव्हते म्हणून सभा घ्याचे असे मी अविनाश जाधव यांना म्हंटलो, मला विषय भरकटवून द्यायचा नव्हता म्हणून ही सभा घेतली असल्याचे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

ही सभा जम्मूमध्येही दाखवली जातेय. अनेक राज्यात ही सभा दाखवली जातेय, असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी ठाण्यात आयोजित उत्तर सभेत अनेक विषयांवर भाष्य केलं.

राज ठाकरे यांच्या उत्तर सभेतील ठळक मुद्दे

* सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे...

* जयंत पाटलांचा चेहरा सतत ‘चकितचंदू’ सारखा...

* हा विझलेला पक्ष नाही तर समोरच्याला विझवत जाणारा पक्ष...

* जेलमध्ये जावून आल्यानंतरही भुजबळ मंत्री झाले...

* या हातानं पाप केलं नाही, तर त्या नोटीसी कोणत्याही असो मी भिक घालत नाही...

* कुठलाही तेढ आम्हाला निर्माण करायचा नाही...

* सर्व मशिंदींवरील भोंगे 3 तारखेपर्यंत उतरवा...

* एक मेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही...

* सुप्रिम कोर्टाचा निर्णय, गृहखातं अंमलबजावणी का करत नाही...

* संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हेच कळत नाही...

* ईडीची पुन्हा नोटीस आली तर समोरं जाईल

* अफजल खान महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का?

* पवार जेव्हा भाषण करतात तेेंव्हा शाहु, फुले, आंबेडकर यांचे नांव घेतात...

* शरद पवार कधीच शिवाजी महाराज यांचे नांव घेत नाहीत...

* संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना यांनीच तयार केल्या...

* पवारांकडे घेण्यासाठी बरेच गुण, पण या गुणांचे काय करायचे?

* आठरापगड समाज स्वराज्यासाठी लढत होता : राज ठाकरे

* राजकारणी स्वार्थासाठी महाराष्ट्र खड्डयात घालतील

* एकमेकांना जेमलध्ये घालण्याची स्पर्धा सुरु आहे...

* मुस्लिमांनी प्रार्थना घरात करावी...

-----------------

खालील बातम्या देखील वाचा...

पांढरीपुलावर कंटेनर धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू 

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश 

ग्राहक बनून आलेल्या महिलेने मंगळसूत्र पळविले 

आयपीएल सट्टा; एक जेरबंद : 15 हजारांचा मुद्देमाल जप्त 

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट... 

Post a Comment

Previous Post Next Post