ग्राहक बनून आलेल्या महिलेने मंगळसूत्र पळविले


। अहमदनगर । दि.12 एप्रिल । सोन्याचे डोरले घेण्यासाठी ग्राहक म्हणून आलेल्या अनोळखी महिलेने सेल्समनची नजर चुकवून पाच ग्रॅम 900 मिली ग्रॅम वजनाचे तेहतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले चोरून नेले. ही घटना माळीवाडा परिसरातील जुनी वसंत टॉकीजजवळील चंदूकाका सराफ या दुकानात घडली.

याप्रकरणी शुक्रवारी (दि. 8 एप्रिल) नितीन वसंत गायकवाड (वय 35, मॅनेजर चंदुकाका सराफ, रा. देशमुखनगर, नागरदेवळे ता जि अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास पोलिस हवालदार नितीन गाडगे हे करीत आहेत.

याबाबत फिर्यादीत दिलेली माहिती अशी की दि. 29 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास दुकानात असताना दुकानातील सेल्समन असलेल्या मनीषा नितीन डहाळे यांनी येऊन सांगितले की, एक महिला सोन्याचे डोरले घेण्यासाठी आली होती. तिला एकूण 5 नग दाखविले.

पण ती महिला सोन्याचे डोरले न घेता दुकानातून निघून गेली आहे. परंतु आता सोन्याच्या ट्रे मध्ये 4 नग दिसत आहेत. असे तिने सांगितल्याने दुकानात सदर डोरले पाहिले, परंतु ते कोठेही सापडले नाही. म्हणून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले 

तेव्हा कॅमेर्‍यात दुकानात आलेली महिला हिने सेल्समन मनीषा डहाळे यांची नजर चुकवून सोन्याचे डोरले घेऊन जाताना दिसली. म्हणून त्या महिलेचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कोठेही सापडून आली नाही. तेव्हा खात्री झाली की, त्या अनोळखी महिलेने दुकानातील सेल्समन मनीषा डहाळे यांची नजर चुकवून एक 33 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे 5 ग्रॅम 900 मिली ग्रॅम वजनाचे 

सोन्याचे डोरले चोरुन घेऊन गेली आहे. चोरी करणारी महिला हिचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील असावे तसेच तिने नेव्ही निळ्या रंगाची साडी व वरुन सनकोट घातलेला होता. दुकानाचे मालक अमित रसिकलाल कोठारी हे आजारी असल्याने लगेच फिर्याद दिली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post