। मुंबई । दि.13 एप्रिल । राज्याचे सामाजिक न्ययमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे.
त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तातडीने त्यांना उपरासाठी दाखल करण्यात आले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल होत धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.
धनंजय मुंडे हे सध्या 46 वर्षांचे आहेत. राज्य सरकारमधील एक धडाडीचा मंत्री आणि वक्ता अशी धनंजय मुंडे यांची मुख्य ओळख आहे.
Tags:
Breaking
