आयपीएल सट्टा; एक जेरबंद : 15 हजारांचा मुद्देमाल जप्त

आयपीएल सट्टा ; एक जेरबंद

15 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोतवाली पोलिसांत गुन्हा


। अहमदनगर । दि.12 एप्रिल । प्रतिनिधी । कोलकाता नाइट रायडर्स-मुंबई इंडियन्स या आयपीएल सामन्यात सट्टा लावताना एकास कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. नदीम बाबासाहब शेख (वय 27 वर्षे रा. पारशाह खुंट, डावरे गल्ली, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याकडून 15 हजार 650 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संपत शिंदे हे पोलीस स्टेशनमध्ये रामनवमीनिमित्त बंदोबस्ताचे नियोजन करत असताना त्यांना आयपीएल क्रिकेटकरिता मोबाईल फोनव्दारे हार-जित करणे कामी लोकांकडून पैसे घेऊन त्यांना व्हाटस्अ‍ॅप मोबाईल फोनवर आयडी व पासवर्ड देत आहे.

सध्या राजलक्ष्मी स्टेशनर्स स्टोअरजवळ जुना कापड बाजाररोड लगत पिरशहा खुंट, नगर येथे चहाच्या टपरीजवळ बसून सट्टा लावला जात आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक गणेश धोत्रे, पोलीस नाईक सलीम शेख, पोलीस कॉस्टेबल अतुल काजळे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले, पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम, पोलीस नाईक संतोष गोमसाळे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत

या पथकाने छापा टाकून आरोपी शेख याच्या मोबाईलची पाहाणी केली असता, त्याच्या मोबाईलमध्ये व्हाटसअ‍ॅपवर काही मोबाईल क्रमांकावरुन पैसे फोन पे ने पैसे घेतल्याचे तसेच त्यांना त्यांचे मोबाईल फोनवर पासवर्ड आकडे पाठवल्याचे दिसून आले. कोतवाली पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे फिर्याद दिली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्य मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक गणेश धोत्रे हे करत आहेत.

-------------------- 

खालील बातम्या देखील वाचा...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन 

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार 

उदयनराजे देणार महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास बुलेट

Post a Comment

Previous Post Next Post