। पुणे । दि.15 एप्रिल । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कायमच कोणत्या ना कोणत्या विषयाने राजकारणात चर्चेत असतात. आता पुण्यात एका बॅनरमुळे राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
मशिदी वरील भोंग्या बाबतच्या विधानाने राज्यात वातावरण तापलं असतानाच आता हनुमान जयंती निमित्ताने राज ठाकरे पुणे दौर्यावर असून पुण्यात त्यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी पुण्यात राज ठाकरे यांच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदू जननायक असा केला आहे.पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे.
यावेळी सामूहिक हनुमान पठणही केलं जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणजे मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी लावलेल्या पोस्टरवर राज ठाकरे यांना आता ‘हिंदुजननायक’ राज ठाकरे अशी नवी उपाधी देण्यात आली आहे.
-------------------------
खालील बातम्या देखील वाचा...
राज ठाकरे यांची उत्तर सभेतील अनेक मुद्दे
जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार....
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अन् मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट
Tags:
Politics
