भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार अंगीकारा : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे प्रतिपादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार अंगीकारा : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे प्रतिपादन

सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था अहमदनगर व समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान रॅली व  सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रम संपन्न

 


। अहमदनगर । दि.15 एप्रिल । अहमदनगर येथील सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था अहमदनगर  यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या कार्यक्रमाचा समारोपिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सीएसआरडीच्या महाविद्यालयात पार पडलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमास‌ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अहमनगर महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे, समाजकल्याण विभागाचे राहुल गांगर्डे, माजी समाज कल्याण अधिकारी रफीक मुंशी,  चर्मकार विकास संघ अध्यक्ष संजय खामकर, दिनेश देवरे, व्याख्याते प्रा.प्रदीप जारे, डॉ.सुरेश मुगुटमल, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संवाद साधत महामानवाच्या कार्याचा आढावा घेत आजच्या काळात डॉ. आंबेडकरांचे विचार किती महत्वपूर्ण आहेत याविषयी मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार प्रत्येकाने आपल्या कृतीतून अंगीकारणे गरजेचे आहे असे आवाजून त्यांनी नमूद केले. तसेच श्री राधाकिसन देवढे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकत लोकशाही व संविधान कायम ठेवण्यासाठी आपण जागरूक असावे तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. डॉ. बाबासाहेब आबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज निर्मितीसाठी समाजकल्याण विभाग कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना त्यांचा विचारांना विसरून चालणार नाही ,ही जयंती साजरी करत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन गतिमान करण्यासाठी त्यांनी दिलेल्या विचारांचे कृतिशील पालन करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे असे मत आपल्या भाषणात संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी मांडले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आपल्यात रुजवून त्यामाध्यमातून समाजविकासाचा ध्यास अंगिकारा व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचवा असे मत आपल्या भाषणात श्री संजय खामकर यांनी मांडले.

बार्टीमार्फत सामाजिक गायानानी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा.प्रदीप जारे यांनी आपल्या व्याख्यानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील क्रांतिकारी घटना,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना त्यांना अभिप्रेत असलेला संवैधानिक भारत घडविण्यासाठी व लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी जाती पाती व धर्माच्या भिंती पाडून एकसंघपणे सजगतेने सामाजिक क्रांतीचा रथ गतीमान करण्यासाठी झटले पाहिजे,वर्तमान व भावी पिढीचे संरक्षण करण्यासाठी खरी आंबेडकर चळवळ मजबूत केले पाहिजे असे मत मांडले.

यापूर्वी सकाळी अहमदनगर शहरात संविधान जागर रॅली काढण्यात आली. अहमदनगर जिल्हा परिषदेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक मानवंदना देत पुढे सिएसआरडी मध्ये विशेष अभिवादन कार्यक्रमाद्वारे समारोप करण्यात आला. समतेच्या माहिती देणारे फलक तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान जागराच्या घोषणा देत सीएसआरडीच्या विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष वेधले.

 यावेळी कार्यक्रमाचे संचालन सॅम्युअल वाघमारे तर आभार प्रदर्शन डॉ.सुरेश मुगुटमल यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीएसआरडीचे प्रा .विजय संसारे, डॉ. जैमोन वार्घिस, प्रा.आसावरी झपके यांच्यासह विद्यार्थी वर्ग व कर्मचारी तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी कातकडे व तेजस भगवने यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post