। अहमदनगर । दि.15 एप्रिल । इलेक्ट्रीक वितरण पेटी चोरीचा प्रयत्न करणार्या दोघांना पकडण्यात आले असून ही कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे. रामायण ज्ञानदेव चव्हाण (रा. कचरा डेपो, बुरुडगाव, ता.जि. अहमदनगर), अक्षय रविंद्र चाबुकस्वार (रा. शास्त्रीनगर, केडगाव, ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर नितीन कांबळे (रा अरणगाव) हा फरार आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.10 एप्रिलला 12 वाजण्याच्या सुमारास नगर तालुक्यातील अरणगाव येथील शिवारातील मेहेर इंग्लिश स्कुलजवळ रोडकडेला असलेली 5 हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रीक वितरण पेटी ही स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी चोरीचा प्रयत्न करताना मिळून आले आहे.
याप्रकरणी सहाय्यक अभियंता रामदास ढाकणे (रा. भूषणनगर, केडगाव, ता. जि. अहमदनगर ) यांनी दिलेला फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चव्हाण व चाबुकस्वार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर कांबळे हा फरार झाला आहे.
पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक मारग, महिला पोलिस हवालदार हरीश्चंद्रे करीत आहेत.
Tags:
Ahmednagar
