शिक्षणामुळेच सुसंस्कृत पिढी निर्माण होते : मायाताई कोल्हे

यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने दादा चौधरी मराठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

शिक्षणामुळेच सुसंस्कृत पिढी निर्माण होते : मायाताई कोल्हे


। अहमदनगर । दि.21 एप्रिल । प्रतिनिधी । बालवयातच विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार व्हावे यासाठी शिक्षक प्रयत्न करत असतात शिक्षकांमुळेच सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मराठी माध्यमाचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. संस्कारातून चांगली सवय लागत असते यासाठी शिस्तप्रिय शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहावे यासाठी खेळाकडे वळावेअसे मत यशवंती महिला मंडळाच्या संस्थापिका मायाताई कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, दादा चौधरी मराठी शाळेने बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जात असलेल्या  शिक्षणामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होईल विद्यार्थ्यांसाठी राबवीत असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहे. बालवाडीतच दादा चौधरी शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण दिले जाते. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलल्याचे प्रतिपादन यशवंती महिला मंडळाच्या संस्थापिका मायाताई कोल्हे यांनी केले.

दादा चौधरी मराठी शाळेतील अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना संस्थापिका मायाताई कोल्हे समवेत जिल्हा अध्यक्ष शर्मिला कदम, उपाध्यक्ष वंदना पवार, सचिव डॉ.संध्या इंगोळे, खजिनदार मंगल शिर्के, शोभा भालसिंग,मंगल शिरसाट, मुख्याध्यापक सुभाष येवले आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक सुभाष येवले यांनी प्रास्ताविकात सांगितले की गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मोफत मिळावे यासाठी संस्था काम करत आहे. कुठल्याही पालकांकडून फी आकारली जात नाही बालवयातच विद्यार्थ्यांना संगणकीय व खेळाचे शिक्षण दिले जाते याच बरोबर दादा चौधरी शाळेने विद्यार्थ्यांनी शिस्तीचे धडे गिरवावे यासाठी काम केले जाते. असे ते म्हणाले यावेळी शर्मिला कदम, डॉ. संध्या इंगोले,शोभा भालसिंग आदींचे  चे भाषण झाले.

---------------- 

खालील बातम्या देखील वाचा...

राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज 

नगरमध्ये अडीच हजार कर्मचारी कामावर हजर 

राज्यातील कोरोना स्थितीबाबत राजेश टोपे यांची माहिती 

घरात घुसून महिलेची चेन पळवली... 

 

Post a Comment

Previous Post Next Post