नगर शहराला येत्या शनिवारी पाणी नाही
महावितरणकडून शटडाऊन; मनपाकडूनही दुरुस्ती
। अहमदनगर । दि.21 एप्रिल ।येत्या शनिवारी (दि.23) महावितरणकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11.30 ते 5 वाजेपर्यत पाणी योजनेचा वीज पुरवठा बंद ठेवून शट डाउन घेण्यात येणार आहे. तसेच या काळात वीज पुरवठा बंद राहणार असल्याने महापालिकेमार्फतही पाणी पुरवठा योजनेवरील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
त्यामुळे शनिवारी नगर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली. मुळानगर व विळद जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाण्याचा उपसा शनिवारी बंद राहणार असल्याने बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर तसेच सारसनगर, बुरुडगाव परिसर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरीलशिवाजीनगर परिसर या भागास सकाळी 11 नंतर पाणी पुरवठा होणार नाही. या भागात रविवारी (दि.24) पाणी पुरवठा होणार आहे.
रविवारी रोटेशन नुसार पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशन रोड, विनायकनगर, स्टेशन रोड, आगरकर मळा, कायनेटीक चौक परिसर व सावेडी इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नाही.
या भागात सोमवारी (दि.25) पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच सोमवारी पाणी पुरवठा असलेल्या मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागात मंगळवारी (दि.26) पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, असे मनपाने कळवले आहे.
Tags:
Ahmednagar
