नगरमध्ये अडीच हजार कर्मचारी कामावर हजर


। अहमदनगर । दि.21 एप्रिल । उच्च न्यायालयाने एसटी कर्मचार्‍यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानंतर नगर विभागात दोन हजार 450 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 22 एप्रिलपर्यंत 90 टक्कयांहून अधिक कर्मचारी हजर होतील व बसच्या फेर्‍यांची संख्या वाढून एसटी पन्हा पूर्वीप्रमउाणे सुरु हाईल, असा विश्वास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

ऑक्टोबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. महामंडळाने कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य केल्या. तरीही कर्मचारी संपावर ठाम होते. अखेर उच्च न्यायालयाने दखल घेऊन कर्मचार्‍यांनी 22 एप्रिलपर्यंत डेडलाईन दिली आहे. तोपर्यंत हजर झाले तर कारवाई होणार नाही, मात्र, त्यानंतर हजर होण्याची संधी मिळणार नाही. जिल्ह्यात संपाआधी तीन हजार 520 कर्मचारी कामावर हजार होते. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 450 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

एसटी फेर्‍या वाढणार
सध्या जिल्हयात एसटीच्या 350 बसेस सुरु असून, त्याद्वारे दीड हजार फेर्‍या होत आहेत. मात्र,पूर्ण कर्मचारी हजर झाल्यानंतर एसटीच्या फेर्‍याही वाढणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. सध्या बंद असणार्‍या एसटीची देखभाव दुरुस्ती सुरु आहे अशी माहिती मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post