। नवीदिल्ली । दि.01 मार्च । रशिया आणि युक्रेन युद्धातील सर्वात मोठी आणि दुखद बातमी समोर आली आहे. रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय मृतक विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे.
अनेक भारतीय अजून युद्धात युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकातील विद्यार्थाचा रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या मिसाईल हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे.
अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले असल्याची माहिती समोर येत आहे.
💥 हे देखील वाचा...एरंडोली गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर मोरे शहीद
💥 हे देखील वाचा...मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे
💥 हे देखील वाचा...महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’