मूळ गावी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
मराठा लाईट इन्फंट्रीमधे करत होते देशसेवा
। अहमदनगर । दि.01 मार्च । श्रीगोंदे तालुक्यातील एरंडोली गावचे सुपुत्र शहीद सुभेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे यांना मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये देश सेवेत कार्यरत असताना रविवारी (२७ फेब्रुवारी) सायंकाळी वीरमरण आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी एरंडोली याठिकाणी येणार आहे व त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार त्यांच्या गावी तालुक्यातील एरंडोली या गावात होणार आहे.
शहीद सुभेदार ज्ञानेश्वर मोरे यांनी २३ मराठा लाईट इन्फंट्रीमधे १८ वर्षे सेवा पूर्ण करून दोन वर्ष जादा सेवा करून पुन्हा सहा महिने देश सेवा करत होते. यादरम्यान देशसेवा करत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मागे वडील सखाराम गोविंद मोरे, आई सुलाबाई सखाराम मोरे, पत्नी सुरेखा ज्ञानेश्वर मोरे, मुलगा महेश ज्ञानेश्वर मोरे (२० वर्षे), मुलगी अर्पिता ज्ञानेश्वर मोरे (१५ वर्ष), भाऊ तुकाराम सखाराम मोरे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यसंस्काराला पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त त्रिदल आजी-माजी सैनिक संघटना श्रीगोंदे तालुका व समस्त त्रिदल आजी-माजी सैनिक संघटना यांनी केले आहे. दरम्यान, सुभेदार मोरे यांना वीरमरणाबद्दल एरंडोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.