पहिल्याच बैठकिमध्ये योगींचा मोठा निर्णय...

पहिल्याच बैठकिमध्ये योगींचा मोठा निर्णय...

मोफत रेशन योजनेला मुदतवाढ

। लखनऊ ( उत्तर प्रदेश ) । दि.25 मार्च । उत्तप्रदेशमध्ये  पुन्हा एकदा योगी परवाला सुरुवात झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच योगी आदित्यनाथ यांनी कामाला सुरुवात केली आहे.

त्यांनी आज शनिवारी आपल्या नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी कोरोना काळात सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेला तीन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्चअखेरपर्यंत होती मुदत : या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नव्याने आलेल्या सरकारने मोफत रेशन योजनेत तीन महिन्यांसाठी वाढ करण्याचा पहिला निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात प्रधानमंत्री अन्न योजना सुरू झाली. 

देशातील 80 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळत होता. अन्नधान्याबरोबरच डाळींची पाकिटे आणि मीठ, साखर आदीही देण्यात येत होते. यापूर्वी ही योजना मार्च २०२२ पर्यंत होती.

-------------------------------------------------------------------------------------------------------------- 

या बातम्या देखील वाचा...

नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांद्याला काय मिळला भाव

पेट्रोल, डिझेलचे दर चौथ्यांदा वाढले 

योगी आदित्यनाथ यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ 

Post a Comment

Previous Post Next Post