योगी आदित्यनाथ यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ


। लखनौ । दि.25 मार्च । योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय एकना क्रिकेट स्टेडियमवर एक भव्य शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला  होता.

ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, भाजप शासित राज्यांचे बहुतांश मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यातील जनतेनेही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. योगी आदित्यनाथ  यांच्यानंतर केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी यूपीच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर आज योगी आदित्यनाथ यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात योगी 2.0 सरकारला सुरुवात झाली आहे.

काही नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या केशवप्रसाद मौर्य यांना दुसर्‍यांदा उपमुख्यमंत्री पदी संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत ब्रजेश पाठक यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

 खालील बातम्या देखील वाचा...

कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”

 राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार : मंत्री वर्षा गायकवाड

भारतीय बाजारातही सोन्या-चांदीचे दर वाढले 

दहा हजाराची लाच स्विकारताना पो

Post a Comment

Previous Post Next Post