आम आदमी पार्टीचे नेते खा. संजय सिंह हे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहेत : किरण काळे

। नवीदिल्ली । दि.10 मार्च । समाजाभिमुख काम करणाऱ्या नेत्यांची आज देशाला गरज आहे. कोणी कोणत्याही पक्षात असला तरी त्याची बांधीलकी ही सर्वसामान्य जनतेशी असणे आवश्यक असते. खा. संजय सिंह यांनी कायम सामान्य माणसाशी आपली नाळ जोडून ठेवत सर्वसामान्य घटकांसाठी काम केले आहे. ते राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहेत, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

खा.सिंह हे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी किरण काळे यांनी समक्ष भेटून अभिष्टचिंतन केले. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी आप पक्षाचे उत्तर प्रदेश राज्याचे सहप्रभारी अनुप पांडे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मी काँग्रेस विचारधारा मानणारा कार्यकर्ता आहे. आज देशात केवळ काँग्रेस पक्षच जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीचा राष्ट्रीय पातळीवरील सक्षम पर्याय असू शकतो. मात्र कोणी कोणत्याही पक्षात असले तरी त्याने सर्वसामान्य जनतेसाठी काम करावे ही अपेक्षा असते. खा. सिंह हे त्यांच्या जनसामान्यांमध्ये असणाऱ्या कामामुळेच आज लोकप्रिय खासदार असल्याचे गौरवोद्गार यावेळी काळे यांनी काढले आहेत.

खा. सिंह हे आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत निकटवर्ती व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. आम आदमी पार्टीच्या मुख्य कोर कमिटीचे ते महत्त्वाचे नेते आहेत. काळे यांनी आपल्या दिली दौऱ्यामध्ये सोनिया गांधी यांचे खाजगी सचिव पी. माधवन, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल, भाजपचे खा.सुजय विखे पाटील आणि आता आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते खा. संजय सिंह यांची भेट घेतल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. काळे यांच्या या राजकिय भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क यामुळे मांडले जात आहेत. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

या बातम्या देखील वाचा...

पहिल्याच बैठकिमध्ये योगींचा मोठा निर्णय...

नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांद्याला काय मिळला भाव 

पेट्रोल, डिझेलचे दर चौथ्यांदा वाढले 

Post a Comment

Previous Post Next Post