सर्वसामान्यांना झटका : घरगुती गॅसचे भाव....


| मुंबई | दि.7 एप्रिल 2025 | पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडरचे भाव देखील वाढले आहेत. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती वापरासाठी लागणार्‍या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत सरकारने ५० रुपयांची वाढ केली आहे. अचानक झालेल्या या दरवाढीचा मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले असल्याने याची झळ आता सर्वसामान्य जनतेला सोसावी लागणार आहे. उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही गॅस सिलेंडरची दरवाढ लागू होणार आहे.  सामान्य ग्राहकांना एलपीजी गॅससाठी ८०३ रुपयांऐवजी आता ८५३ रुपये मोजावे लागणार आहे.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात प्रत्येकी २ रुपयांची वाढ करण्यात आलीय. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच राहणार आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही असे सांगितले जात आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

 

Post a Comment

Previous Post Next Post