तांत्रिक बाबी तपासून हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

। मुंंबई । दि.10 मार्च । अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी  ग्रामपंचायत हिवरखेड यांनी ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ठराव पारित केला. पण ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर करतांना गावाची लोकसंख्या, कृषीवर आधारित नसलेल्या लोकसंख्येचे प्रमाण यासारख्या तांत्रिक बाबी विचारात घेतल्या जातात. 

या तांत्रिक बाबी तपासून प्राथमिक घोषणा करावी लागते. यानंतर एका महिन्यात लोकांच्या हरकती, सूचना विचारात घेतल्या जातात. त्यानंतर ग्रामविकास विभागामार्फत त्यावर कार्यवाही करण्यात येईल. अन्य बाबी तपासून एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

हिवरखेड येथे नगरपंचायत स्थापन करण्याबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी सांगितले.

(विधानपरिषद प्रश्नोत्तरे)

Post a Comment

Previous Post Next Post