कोरोनाकाळात शिक्षकांसाठी विविध स्पर्धेचे अखिल संघटनेने केलेले आयोजन कौतुकास्पद : उपसभापती डॉ.दिलीप पवार
ऐक्य मंडळाचा अभिनव उपक्रम
। अहमदनगर । दि.10 मार्च । अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या आवाहनानुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ- अहमदनगर व ऐक्य मंडळाच्या वतीने जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व महिला शिक्षिकांकरिता जागतिक महिला दिन व शिक्षक नेत्या स्व.सुलभाताई दोंदे यांच्या जयंतीनिमित्त कोरोना काळातील लाकडाऊन मध्ये विविध नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
विविध स्पर्धेचे पुरस्कार वितरण प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन समारंभपूर्वक कार्यक्रमात प्रदान करण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी दिली .
कोरोना काळात महिला शिक्षकांसाठी विविध कलागुण स्पर्धेचे संघटनेने केलेले आयोजन हे कौतुकास्पद असल्याचे नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी म्हटले आहे .या विविध कलागुणांच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .ते पुढे म्हणाले की, कोरोना काळामध्ये लोक एकमेकांना भेटायचेच काय पण साधा नमस्कार सुद्धा घालायला घाबरत होते;
मात्र याच काळामध्ये संघटनेने ऑनलाइनच्या माध्यमातून विविध स्पर्धा घेऊन अस्वस्थ व नैराश्य आलेल्या महिला शिक्षकांशी जवळीक साधून त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रेरणा व ऊर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संघटनेने केले असल्याचे डॉक्टर पवार यांनी आवर्जून सांगितले .
अहमदनगर महापालिकेचे सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक अशोक बडे यांनी अखिल संघटना ही राबवीत असलेले उपक्रम हे शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त असून या स्पर्धेद्वारे शिक्षकांना आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन दर्जेदार होण्याकामी संबंधित शिक्षकांना एक प्रकारची उभारी मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे .
या स्पर्धांमध्ये एकपात्री अभिनय, वक्तृत्व ,रांगोळी ,चित्रकला व निबंध यांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महिला शिक्षकांनी मोठा सहभाग नोंदवून आपले कलाकौशल्य व कलागुणांचे ऑनलाइन सादरीकरण केले .
या स्पर्धेमध्ये तेजस्विनी शिंदे,सुमन तिजोरे सुरेखा रणदिवे सुप्रिया इंगळे,सीमा गावडे,वृषाली घोडके ,भाग्यश्री आढाव तृप्ती पडघमल ,अनिता उदबत्ते, संगीता गायकवाड ,संगीता कर्जुले,सुरेखा वाघमारे,सुमेधावती शेजुळ,मेनका ढाकणे , नीता आनंदकर शोभा कराळे ,अर्चना जाचक, दीपश्री वाघ ,मीरा नीतनाथ, क्रांती करजगीकर, रूपाली वाघुले ,ज्योत्स्ना कासुळे,दिपाली कापरे ,दिपाली रेपाळ ,क्रांती निक्रड आदींना गौरविण्यात आले .
या कार्यक्रम प्रसंगी वृषाली घोडके ,दिपाली रेपाळ , मीरा नीतनाथ. सीमा गावडे आदी महिला स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांनी संघटनेने राबविलेल्या या अभिनव उपक्रमास भरभरून दाद दिली .
याप्रसंगी मा.नगरसेवक दत्ता सप्रे, ग्रामविकास मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव कातोरे , ज्येष्ठ उद्योजक पंढरीनाथ सप्रे, संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य संघटक राजेंद्र , जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले,जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रणदिवे ,विलास लवांडे ,मधुकर डहाळे, जिल्हाचिटणीस प्रदिप चक्रनारायण , माजी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण चेमटे,अखिल पदवीधर जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद,
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके, जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, प्राथ.शिक्षक बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे, सुखदेव डेंगळे, शहाजी जरे, महादेव चोभे, पांडुरंग झरेकर , विश्वजित कदम,प्रविण शेळके, विनायक गोरे, भागचंद सातपुते ,विश्वनाथ कदम , रवींद्र दरेकर , सुनील पठारे , लहू फलके , बबन जर्हाड, संतोष ठाणगे ,नितीन गायकवाड, वाघुले आदी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र निमसे यांनी केले . सूत्रसंचालन दिपाली बोलके यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मण चेमटे यांनी मानले.