धनकवडीच्या विवाहितेने राहुरीत केली आत्महत्या


 । अहमदनगर/
राहुरी । दि.24 फेब्रुवारी ।  पुण्याच्या धनकवडी येथील रहिवाशी असलेल्या विवाहीत तरुणीचा राहुरी खुर्द येथील लाॅजवर गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना आत्महत्या असल्याचा अंदाज आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघड झाली.

अनिता राजू कणसे ( २९, रा. ओंकार अपार्टमेंट सावरकर चौक धनकवडी) ही विवाहिता मंगळवारी राहुरी खुर्द येथील न्यू भरत हाॅटेलच्या लाॅजवर थांबलेली होती. बुधवारी सकाळी लाॅजची सफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला असता खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. 

हाॅटेल चालकाने याची खबर पोलिसांना दिल्याने उपनिरीक्षक निरज बोकील व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. लाॅजच्या खोलीचा दरवाजा उचकटून आत पाहणी केली असता छताच्या पंख्याला ओढणी अडकवलेल्या अवस्थेत अनिताचा मृतदेह आढळून आला. 

निताच्या उजव्या हातावर चुन्याच्या सहाय्याने इंग्रजी अक्षरात नाव गिरवल्याचे दिसून आले. जवळच दोन मोबाइल हॅन्डसेट व पैशाची पर्स सापडली. आधारकार्ड वरून राहुरी पोलिसांना अनिताची ओळख पटण्यास मदत झाली.

Post a Comment

Previous Post Next Post