। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । पतीसमवेत दुचाकीवरुन जात असताना केडगाव बसस्टॉपजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र धूमस्टाईल पळवून नेले.
मंगळवारी (दि.22) सायंकाळी पावणेआठ वाजता ही घटना घडली. केडगाव गावठाण येथे राहणार्या पुष्पा विजय शिंदे या पतीसमवेत दुचाकीवरुन जात होत्या.
केडगाव बस स्टॉपसमोरील स्पीडब्रेकरजवळ त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला असताना, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने चालत्या गाडीवरच त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसका मारुन तोडून नेले.
याप्रकरणी पुष्पा शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि विवेक पवार करत आहेत.
Tags:
Ahmednagar