। मुंबई । दि.15 फेबु्रवारी । शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात आज पत्रकार परिषद घेऊन धमाका केला. राऊत यांनी कालच शिवसेनेची पत्रकार परिषद होणार असून त्यात भाजपच्या साडेतीन लोकांची पोलखोल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राऊत काय पोलखोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, महाराष्ट्र आणि मराठी माणसाविरोधात जे आक्रमण सुरू आहे. त्याविरोधात कोणी तरी रणशिंग फुंकायला हवं होतं. ते शिवसेना भवनातून आम्ही फुंकत आहोत. तू काही पाप केलं नसेल, काही गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नको, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सागंत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्याच पद्धतीने शिवसेना पुढे नेत आहेत. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, हा संदेश देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला.
ठळक मुद्दे
* सोमय्या ईडी कार्यालयात बसुन दही खिचडी खातात.
* असा तुरुंग नाही ज्यात मला दोन वर्षे ठेवतील : राऊत
* एका वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात 900 कोटींचा सेट होता
* किरीट सोमय्या ईडीचे दलाल
* किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना पीएतसी घोटाळ्यातील आरोपांखाली तातडीने अटक करा.
* संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात मेहंदी, नेल पॉलिश करणार्यांची देखील ईडीकडून चौकशी
* मन साफ आहे तर कुणाच्या बापाला घाबरु नका असा सल्ला बाळासाहेबांनी दिला आहे.
* आम्ही खूप सहन केलं, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत
* हम डरेंगे नही झुकेंगे नाही- आपको झुकाएंगे
* शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत
* ज्या दिवशी माझ्या नातेवाईक, दोस्तांवर छापे होत होते त्या रात्री मी अमित शहांना फोन केला होता
* सध्याची पत्रकार परिषद पुर्ण झाली नाही तर हा ट्रेलर आहे. पुढे पुढे काय होते पहा.
Tags:
Breaking