। मुंबई । दि.09 फेब्रुवारी । जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून राज्यात सुपरमार्केट, मोठ्या किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी देण्याच्या धोरणा वर, हा निर्णय मागे न घेतल्यास येत्या सोमवार 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथे राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आणि ओपन वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे स्मरणपत्र पाठवले आहे.
अण्णांनी या विषयी एक पत्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले होते त्याला उत्तर न मिळाल्याने त्यांनी पहिले आणि आज दुसरे असे चार पत्र पाठवले आहेत, मात्र राज्य सरकारकडून अजून अण्णांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे आता आण्णा आमरण उपोषणाचा निर्वानीचा इशारा दिला आहे.
युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे
युवाशक्तीला जपण्याचे काम समाजाने, सरकारने केले पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने तंबाखू सारख्या गोष्टी सर्वत्र उपलब्ध केल्याने आजकाल लहान मुलेही तंबाखूचे व्यसनाधिन होत आहेत त्याच पद्धतीने जर वाईन एक किरकोळ पद्धतीने सर्रास दुकानांमधून विकली जाणार असेल तर मुले, युवक ही राष्ट्राची युवाशक्तीची आहे ती ही या वाईनची चव चाखेल. आणि या सर्व युवा शक्तीचा ऱ्हास होईल याची कल्पना सरकारला हवी आणि त्याची जबाबदारीही सरकारने समोर ठेवून वाइन विक्रीचा निर्णय बदलावा अशी मागणी अण्णांनी केली.
Tags:
Breaking