। नवीदिल्ली । दि.10 फेब्रुवारी । कुस्तीपटू खलीने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार द ग्रेट खलीने आज दिल्लीत भाजपचे सदस्यत्व घेतले. खली मूळचा हिमाचल प्रदेशचा आहे. त्यांचे खरे नाव दलीपसिंग राणा आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खलीने पीएम मोदींचे कौतुक केले. पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये द ग्रेट खलीचा प्रवेश भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो.
गेल्या वर्षी खलीने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर काय झाले, हे उघड झाले नाही, पण ते सपाकडे जातील, असा अंदाज होता.
द ग्रेट खली म्हणाला की, भाजपमध्ये प्रवेश केल्याने मला चांगले वाटत आहे. खली म्हणाला की, क्वचितच असा एकही देश असेल जिथे मी कुस्ती खेळली नाही. मला पैसे कमवायचे असते तर मी अमेरिकेतच राहिलो असतो.
पण माझे देशावर प्रेम आहे म्हणून मी भारतात आलो. मोदींमुळे देशाला योग्य पंतप्रधान मिळाल्याचे मी पाहिले आहे. खली पुढे म्हणाला की, मी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या विचारसरणीने प्रभावित आहे.
Tags:
Breaking