। सांगली । दि.21 फेब्रुवारी । भारतमातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढताना विरमरण आलेले रोमित तानाजी चव्हाण आज (21 फेब्रुवारी) अनंतात विलीन झाले. मुळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या शिगाव येथील रोमित चव्हाण हे जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे कर्तव्यावर होते.
कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांविरोधात सुरु केलेल्या शोधमोहीमे दरम्यान अचानक चकमक झाली. यात रोमित यांनाक वीरमरण आले. रोमीत यांच्यावर पार्थीवावर वारणा नदीकाठी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पालकमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत प्रशासकीय अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.
रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे. तर बहिण शिक्षण घेत आहे. शिगाव गावासह आजूबाजाच्या भागात ही बातमी समजताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावावर शोककळा पसरली आहे. पार्थिव रविवारी संध्याकाळपर्यंत गावात येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
Tags:
Breaking