गाडळकर मळ्यात ऊस जळून खाक

। अहमदनगर । दि.21 फेब्रुवारी । नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात असलेल्या गाडळकर माळ्यातील गणेश गाडळकर यांच्या शेतातील दोन एकर उसाला आग लागून तो जळून खाक झाला. ही आग कशामुळे लागली, याचे स्पष्टीकरण झाले नाही.

रविवारी (दि 20 फेब्रुवारी) दुपारी उसाच्या शेतातून धूर दिसू लागल्याने येथे आग लागल्याचे समजले. या लागलेल्या आगीत सर्व ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे गाडळकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी मनपा अग्निशामक दलाच्या दाडीसह एमआयडीसी अग्निशामक दल आणि व्हीआरडीई अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावून घेण्यात आल्या होत्या. 

अग्निशामक दलाच्या गाड्यांनी अखंड पाण्याचा मारा केल्यामुळे आग आटोक्यात आली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सर्व दोन एकर ऊस जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post