बसस्थानकातून भरदिवसा महिलेची पर्स पळवली


। अहमदनगर । दि.14  फेब्रुवारी । नगर शहरातील स्वस्तिक चौकाजवळील बसस्थानकातून भरदिवसा महिलेच्या हातातील सोन्याचे दागीने ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना रविवारी (दि.13) दुपारी 2.30 च्या सुमारास घडली.

याबाबत करिश्मा समीर शेख (वय 24, रा.शहापूर, ता.नेवासा) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेख या कामानिमित्त नगरमध्ये आलेल्या होत्या.

रविवारी दुपारी 2.30 च्या सुमारास स्वस्तिक चौकाजवळील बसस्थानकात त्या बसची वाट पाहत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन हातचलाखी करत त्यांच्या हातातील बॅगमध्ये असलेली छोटी पर्स पळवून नेली.

यामध्ये 64 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने, आधार कार्ड व पॅनकार्ड होते असे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post